सावरगावात दसरा मेळाव्याला भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचं होणार लोकार्पण.
गेल्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात भगवान बाबांचं स्मारक बांधण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. त्यानुसार एका वर्षात या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या दसरा मेळाव्याला स्मारकाचं लोकार्पण होणार आहे.
या वर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे संत भगवान बाबांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. हे काम सध्या अंतिम टप्यात आलं आहे.. एका भव्य चौथऱ्यावर पाण्यावर उभी असलेली भगवान बाबांची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. दोन टन वजनाची ही मूर्ती फायबरपासून बनवण्यात आली आहे. स्मारकाच्या बाजूला ध्यान मंदिर आणि भव्य गार्डनही उभारण्यात येणार आहे.
या वर्षीच्या दसरा मेळाव्याचं खास आकर्षण म्हणजे हे स्मारक असणार आहे आणि हे स्मारक पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी येणार आहेत. भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर सावरगाव या भगवान बाबांच्या जन्मगावी गेल्या वर्षी पहिल्यांदाच दसरा मेळावा घेण्यात आला आणि या वर्षी देखील याच ठिकाणी दसरा मेळावा घेण्यात येणार आहे.
भगवान गडावरील दसरा मेळाव्यानिमित्त होणाऱ्या भाषणाला महंत नामदेव शास्त्री परवानगी नाकारल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून दसरा मेळाव्यासाठी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. म्हणूनच या वर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी भगवान बाबांचे भव्य स्मारकाचं लोकार्पण केलं जाणार आहे.
सावरगावात गेल्या वर्षी पहिल्यांदाच दसरा मेळावा झाला तेव्हा पंकजा मुंडे यांनी या भव्य स्मारकाची घोषणा केली होती. एका वर्षाच्या आत हे स्मारक तयार होऊन या दसऱ्याला त्याचं लोकार्पण होणार आहे. 18 तारखेला होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे.
भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी वेगळा मार्ग निवडत भगवान बाबांचं जन्मगाव सावरगावातून नवी परंपरा सुरु केली. यावर्षी सावरगावात भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचं लोकार्पण होणार आहे.
दसरा जवळ आला की राज्यात दोन मेळाव्यांची चर्चा होते. एक म्हणजे शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आणि दुसरा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी खंडित केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सावरगावमध्ये दसरा मेळावा भरवून शक्तीप्रदर्शन केलं. यावर्षी तर पंकजा मुंडे भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचं लोकार्पण करणार आहेत.
भगवान बाबांची 25 फुटांची मूर्ती पाण्यावर तरंगताना साकारण्यात येत आहे. ही मूर्ती बनवण्याचं काम प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे हे करत आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण मूर्ती उच्च दर्जाच्या पॉलिस्टरमध्ये तयार करण्यात आली असून सध्या या मूर्तीचं काम हे अंतिम टप्प्यात आहे. येत्या 17 तारखेला ही मूर्ती सावरगाव येथे नेण्यात येणार आहे. 18 तारखेला म्हणजे दसरा मेळाव्यात या मूर्तीचं लोकार्पण होईल.
मोठ्या आरोप-प्रत्यारोपानंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्याची जुनी परंपरा खंडित करण्यात आली. पंकजा मुंडेंनी भगवान बाबांच्या जन्मगावातून एका नव्या परंपरेची सुरुवात केली. पंकजा मुंडेंनी गेल्या वर्षीच सावरगावात भव्य स्मारक बांधणार असं जाहीर केलं होतं.
भगवान बाबांची 25 फुटांची मूर्ती पाण्यावर तरंगताना साकारण्यात येत आहे.
येत्या 17 तारखेला ही मूर्ती सावरगाव येथे नेण्यात येणार आहे. 18 तारखेला म्हणजे दसरा मेळाव्यात या मूर्तीचं लोकार्पण होईल.
ही मूर्ती बनवण्याचं काम प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment