In this blog we provide inforemation about bhagwan baba(श्री संत भगवान बाबा),bhagwangad (भगवानगड),vamanbhau (श्री संत वामनभाऊ).We also provide news related to bhagwangad.

test

Breaking

Post Top Ad

Your Ad Spot

Monday, September 24, 2018

समाधी


अनेक वर्षे बाबांची कीर्तनकारणे भ्रमंती सुरू असताना त्यांनी समाजाचे जवळून निरीक्षण केले, अभ्यास केला आणि समाजाचे विदारक चित्र दिसल्यावर ते बाबांनी कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन केले. समाजातील अनेक वाईट प्रथा, चालीरीती बंद करण्याचा प्रयत्न केला. अंध:कारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग बाबांनी सांगितला. इ.स. १९६५ च्या प्रारंभी भगवानबाबांची प्रकृती खालावत चालली होती. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते, त्यांची प्रकृती आणखी खालावली व प्रकृती अस्वास्थ्यामुळे भगवानबाबांना पुणे जिल्ह्यातील, रुबी हॉल क्लिनिक इथे औषधपाण्याकरिता दाखल केले. भगवानबाबा ह्दयविकाराने आजारी असताना उपचार करण्यासाठी रुबी हॉल क्लिनिक इस्पितळातील डॉ.के.बी.ग्रँट व त्यांची टीम दाखल झाली. त्यांच्या विनंतीला मान देऊन नाथा मिसाळ हा ज्ञानेश्वरीचे पारायण करत असे. तेथेच सोमवार, दि. १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी समाधिस्थ होऊन जगाचा निरोप घेतला. तीन वेळा‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, शान्तिब्रह्म श्री एकनाथमहाराज की जय’हा जयघोष करून आत्मा पांडुरंगचरणी विलीन केला व देह ठेवला. लाखोंचा पोशिंदा अनंताकडे झेपावला. त्या भूमीला धरणीकंपसारखा भासला. १९१८ च्या दशकामध्ये तमाम समाजाच्या ह्रदयाला हात घालत जवळपास चार दशके महाराष्ट्रच नव्हे तर देशभर पसरलेली धर्मचळवळ शांत झाली. भागवत धर्मात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राचे उत्तुंग कीर्तनकार व्यक्तिमत्त्व हरपल्याने शोककळा पसरली. अटकेपार जावून डौलाने फडफडणारा जरीपटका स्थंबावरून अनंताकडे झेपावला. भगवानबाबा हे भागवत धर्मप्रसाराचे कार्यकारणातले एक पर्व होते आणि त्या पर्वाची सांगता झाली. भगवानबाबा नावाच्या एका पर्वाचा अस्त झाला. एका युगाचा अंत झाला. एक वादळ शांत झाले. झंझावात विरून गेला. शतकानुशतके वाट पहावी लागलेला भागवत धर्माच्या सूर्याच्या अंत झाला. वारकरी संप्रदायाचा आधारवड गेला. भागवत धर्माचा वटवृक्ष उन्मळून पडला. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक अध्याय संपला. शुन्यातून सार्मथ्य निर्माण करणारा कुशल संघटक तारा हरपला. सामान्य माणसासाठी झटणारा एक सिंह गमावला. कीर्तनातून निघणारे सूर पांडुरंगचरणी विलीन केला होता. तब्बल पंचेचाळीस वर्षे वा त्याहूनही अधिकचा प्रदीर्घकाळ महाराष्ट्रात ज्या भगवानगडावर त्यांनी कीर्तने गाजविले ते सुन्न पडले. बाबांच्या निमित्ताने जनतेला त्यांचा ‘देव’ गवसला होता. त्यांची शैली, भाषा, व्यक्तिमत्त्व, बाणा हा पुन्हा होणे नाही. प्रखर अलौकिक भागवत भक्तीचा विचार देणार्‍या एका विचारसूर्याचा अस्त झाला. सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरला.

त्यांच्या अंतिम विनंतीला मान देऊन त्यांचे पार्थिव पुण्याहून भगवानगडावर आणले गेले. उत्त्तराधिकारी नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता त्यामुळे भगवानबाबांचे आवडते शिष्य म्हणून भीमसिंह महाराज यांना भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची विनंती केली गेली. परंतु भीमसिंह महाराजांनी 'आपली भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची लायकी नाही' असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे भगवानबाबांचे परममित्र बाबुलाल महाराज पाडळीकर यांनी ह.भ.प. मामासाहेब दांडेकर यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले. ते आज्ञापत्र पाहिल्यावर भीमसिंह महाराज गादीवर बसण्यास तयार झाले व भगवानबाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून भीमसिंह महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार भीमसिंह महाराज यांनी केले.

भगवानबाबांचा कीर्तने ऐकलेले मंडळी आपल्या लाडक्या सम्राटाच्या बाबांचे जाण्याने. भगवानबाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी, भगवानबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावोगावची भजनी मंडळी, दिंड्या, टाळ, पखवाज, मृदंग, तालमणी घेऊन आली होती. लाडक्या बाबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सकाळपासून भगवानगडावर भाविक येत होते. पार्थिवाची प्रतिक्षा करीत भर ऊनात भगवानगडावर कानाकोपर्‍यात बसले. त्यातही जनसागर उपस्थितीमुळे गर्दी आवरणे पोलिसांनाही अवघड ठरले. जनसागर उसळल्यामुळे बाबांचे पार्थिव भगवानगडावर आणण्यास उशीर होत होता तरीही सकाळपासून बाबांच्या अखेरच्या दर्शनासाठी आसुलेले भाविक जागचे हलत नव्हते. भाविकांचा महासागर पार करीत बाबांचे पार्थिव भगवानगडावर आणण्यात आले. जनसागर त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. सांयकाळी सुमारास रथातून पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आले. पार्थिव व्यासपीठावर ठेवण्यात आल्यानंतर परत या परत या भगवानबाबा बाबा परत या...एकच बाबा.भगवानबाबा...भगवानबाबांचा जयजयकाराच्या घोषणा सुरू झाल्या व या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पार्थिव व्यासपीठावर ठेवताच दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागू लागली. दर्शन घेताना सर्व भाविक भावनाविवश झाले होते व भाविक अक्षरश: धाय मोकलून रडत होते. कुणी हात जोडून तर कुणी डोळे बंद करून गहिवरले होते. आर्त हाक घालण्यास भाविकांनी सुरुवात करताच भगवानगडही हेलावले. आपल्या लाडक्या बाबांला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले. भाविक निघालेल्या अंत्ययात्रेत सामिल होत होते. जसजशी अंत्ययात्रा पुढे सरकत होती, तसतसे भाविक आणखीनच भावूक होत होते. अंत्यविधी सुरू झाल्यानंतर अनेक भाविकांना शोक अनावर झाला व यावेळी अनेक भाविकांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. जनसागर जणू शोकसागरात बुडाला होता. सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. लाखो भाविकांचाही अश्रूंचा बांध फुटला होता. अंत्यविधी झाल्यानंतर रात्री मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित राहून जयजयकाराच्या घोषणा देत होते. नंतर लाडक्या बाबांचे पार्थिव विठ्ठलाच्या मंदिराजवळच येथे आणण्यात आले. तेथेच श्री संत भगवानबाबाची संगमरवरी पाषाणबांधणी समाधी बांधली गेली व भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरली.

श्रीक्षेत्र भगवानगडावर भगवानबाबा यांची समाधी गीतेतील वचनाप्रमाणे अजूनही भाविकांना दिशा दाखवत आहे. समाधीनंतरही भाविकांची काळजी घेण्याबरोबरच पांडुरंगचरणी विलीन झाल्याकारणाने लाखो भाविकांना त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद, दर्शन आणि मार्गदर्शन लाभत आहे. भगवानबाबा आज देखील अनन्यभावाने भक्ती करणार्‍या भाविकांच्या सदैव पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. भगवानबाबांचा भक्तिरसाचा वारसा आजही शेकडो भाविक जपताना दिसतात आणि उत्तरोत्तर तो वाढतच जाईल यात शंकाच नाही. आजही त्यांच्या समाधीला पाहून भाविक भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होतात. भक्तिभावात एकरूप झालेल्याना भाविकांना बाबांच्या समाधीजवळ त्यांच्या विठ्ठलनामाचा गजर ऐकू येतो असे बोलले जाते. भगवानगडावर आल्यावर प्राप्त होणारी मनःशांतीमुळे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.

योगियाची संपदा... त्याग आणि शांती प्रसन्न आचार्य... उभयलोकी किर्तीसोहळामान सम्राट... ईश्वर विभूती... प्रकाशमान... ब्रह्मचारीरूप गुरुवर्य... सर्वश्री... वैराग्यमुर्ती... समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देणारे... समाजाचे चंद्रसूर्य समजले जाणारे... प्रबोधनाचा महामेरु... भक्तिरसाचा सागर... मायेचा पाझर... पंढरीचा अखंड वारकरी... तुळशीच्या माळेने क्रांतीची ज्योत पेटविणारे... परोपकारी... भक्तीचा गड उभारणारे... भजन-कीर्तन, प्रवचनाची गंगा... शुद्ध आचरणाचा पितामह... स्नेहप्रेमाचे सम्राट...परमविठ्ठलभक्त ... ऐश्वर्यसंपन्न संत... ह.भ.प. श्री भगवानबाबांचे कार्य अलौकिक होते. समाजात झालेले वैचारिक प्रदूषण भगवानबाबांनी कमी केले होते. अध:पतित समाजाला सन्मार्गावर आणले होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot